Ad will apear here
Next
श्री खंडोबा-म्हाळसा शाही विवाहाला लाखोंचा जनसागर


पाल (ता. कराड, जि. सातारा) :
पाल येथे तारळी नदीच्या काठी महाराष्ट्रासह युगानुयुगे भक्तांची आर्त हाक ऐकण्यासाठी उभा असलेला, कष्टकरी व श्रमकरी वर्गाचे दैवत असलेला श्री खंडेराया बुधवारी (आठ जानेवारी २०२०) गोरज मुहूर्तावर मानकरी वर्गाच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखदार शाही पद्धतीने पिवळ्याधमक झालेल्या पालनगरीमध्ये म्हाळसादेवींशी विवाहबद्ध झाला. सुमारे सहा लाख भविकांच्या साक्षीने हा विवाहसोहळा पार पडला.

भक्तांचा पाठीराखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री खंडोबास बोहल्यावर चढताना पाहण्यासाठी या वर्षीही भाविकांचा जनसागर लोटला होता. कोणताही अनुचित प्रकार किंवा दंगा या वेळी घडला नाही. प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी केलेल्या नेटक्या नियोजनाप्रमाणे सर्व घडल्यामुळे यात्रा सुसूत्र पद्धतीने पार पडली. सर्वांना या विवाहसोहळ्याचा क्षण आपल्या डोळ्यात साठवता आला. 

खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध भागांतून आलेले खंडोबाचे मानकरी, मानाच्या सासनकाठ्या, मानाचे गाडे, पालखी यांसह देवस्थानच्या रथातून मानकरी यांना रथातून घेऊन निघालेली शाही मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास देवस्थानचे मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले.



मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मानकरी देवराज पाटील देवास पोटास बांधून अंधार दरवाजाजवळ आले. या ठिकाणी ते रथात विराजमान झाले आणि तेथून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. फुलांनी सजविलेल्या छत्र्या, चोपदाराचा घोडा, सासनकाठी, पालखी, मानाचे गाडे व त्यापाठोपाठ राजेशाही थाटात श्री खंडोबा व म्हाळसा यांना रथातून घेऊन निघालेले मानकरी अशी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करून ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत देवाचे दर्शन घेतले. 

मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होताच भाविकांची एकच गर्दी होते; मात्र गत वर्षी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी वाळवंटात जाण्यासाठी मुख्य मिरवणूक मार्गावरील पुलाला समांतर पूल साकारला होता. या पुलावरून भाविकांना सोडले जात होते. त्यामुळे मुख्य चौकात तारळी पुलावरून व काशीळमार्गे होणारी गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत झाली होती. तारळी नदीपात्रातील दक्षिण पात्र भंडारा खोबरे उधळण्यासाठी भाविकांनी खचाखच भरले होते. 

पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाहसोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने पिवळाधमक झाला होता. मुख्य मिरवणूक तारळी नदीपात्रात येताच लाखो भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करून खंडोबा व म्हाळसा यांचा जयजयकार केला. लाखो भाविकांनी खचाखच भरलेले तारळी नदीचे दक्षिण पात्र भंडाऱ्याने पिवळेधमक झाले होते. 

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुख्य मिरवणूक तारळी नदीपात्रातून मारुती मंदिरमार्गे बोहल्याजवळ आली. या वेळी खंडोबाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला.



देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले व मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले व पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर जाणवत होते. 

जिल्हा प्रशासनाने मंदिर परिसरातील मुख्य चौक पूर्णतः रिकामा ठेवला होता. मिरवणुकीवेळी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिकेड्सचा केलेला प्रयोगही यशस्वी झाला. काशीळ-पाल मार्गावरून येणारे भाविक थेट वाळवंटात पाठविले जात होते तर हरपळवाडी या मार्गावरून व मंदिरातून येणारे भाविक हे नदीच्या उत्तर वाळवंटात साकव पुलावरून सोडले जात होते. वाळवंटात गेलेला भाविक परत त्या दिशेने मंदिराकडे येणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली होती. तारळी पूलही बहुतांशी रिकामा ठेवला होता. या पुलावरून भाविकांना थेट वाळवंटात सोडले जात होते.

यात्रा शांततेत पार पाडल्याबद्दल देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. 

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून आलेल्या भाविकांना विनासायास श्री खंडोबाचे दर्शन मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने केलेल्या शिस्तबद्ध दर्शनबारीचेही भाविकांकडून स्वागत होत होते. तारळी नदीचे दक्षिण पात्र भाविकांनी खचाखच भरले होते, तर तारळी नदीचे उत्तर पात्र हे दुकानांबरोबरच भाविकांनी तुडुंब भरले होते. लहान-मोठे पाळणे, सिनेमाचे तंबू, विविध खेळण्यांची दुकाने, मेवा-मिठाईची दुकाने गजबजून गेली होती. वाघ्या मुरळी यांचे जागरणाचे कार्यक्रम नदीच्या उत्तर व दक्षिण पात्रात होत होते.

(खंडोबा देवस्थानाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZTMCI
Similar Posts
Flame of Hope Today, the temple in polo forests of Gujarat lies abandoned and forgotten, plundered by Izlamic invaders centuries ago. The sanctum sanctorum is bare, the Murti being destroyed, stolen or lost long ago. The shikhara has plants growing from it. Only curious weekend ‘tourists’ visit the temple now, to
तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरातील आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय स्थापत्यशास्त्र! तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील १००० वर्षांपूर्वी, चोला राजवटीत, साधारण २०-२५ वर्षांत बांधून पूर्ण केलेले बृहदीश्वर मंदिर हा भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक अचंबित करणारा नमुना आहे!
कुरवपूरच्या प्रवासाची गोष्ट... ग्रॅनाइटच्या मोठमोठ्या दगडांनी बनवलेल्या पुरातन मंदिरात प्रवेश करताच मन प्रसन्न झाले. गर्भागृहात उजव्या बाजूला पाहिले, की श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दर्शन होते. मन प्रसन्न करणारी शांतता, अष्टगंधाचा दरवळणारा सुगंध यामुळे साऱ्या दुःखांचा विसर होतो आणि माणूस देवाला आपोआप शरण जातो. स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ इथे कायम विराजमान असतात
Faith always moves me Particularly the simple, unshakeable faith that so many people in India have in their Gods. In my solo travels in India, I have met some remarkable people who have pursued dharma with a conviction that acts like a lodestar for them as they navigate their life’s journey across the sea of samsara. As you

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language